Maharashtra Forest Department
Add to Favourite   -A   A   A+   English  
 

वृत्त विशेष

प्रस्तावना

नागपूर प्रादेशिक वनवृत्ता अंतर्गत नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया ही चार वनविभाग आहेत. त्याचे क्षेत्र त्या त्या जिल्हा इतके आहे.सदर विभाग मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर यांचे प्रशासकीय नियंत्रणाखाली आहेत. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक म.रा. नागपूर यांचे कार्यालयीन अर्धशासकीय पत्र क्र. कक्ष-22/6/29 दि. 14/07/2006 अन्वये अवैध शिकार प्रतिबंधक घटक देखील त्यांचे प्रशासकीय नियंत्रणाखाली दिनांक 01/09/2006 पासून देण्यात आले आहे.नागपूर वनवृत्तातील वनांत सागवान, बिजा, साजा, हलदु, कळम इत्यादी इमारती प्रजाती बरोबरच धावडा,तेंदु,भेरा,गरारी,मोहा,सालाई,मोवई वगैरे इमारती तथा वृक्षांच्या प्रजाती मोठया प्रमाणावर आढळून येतात. गोंदिया वन विभागात विपूल प्रमाणात आणि काही प्रमाणांत भंडारा नागपूर वनविभागात नैसर्गिक बांबु आढळून येते.नागपूर ही इमारती लाकडाची मोठी व्यापार पेठ आहे. भारतातील सर्व मोठया शहरात आणि परदेशात सुध्दा नागपूर वरुन इमारती चिराण मालाची निर्यात होत असते. लाकडासाठी नागपूर ही आशिया खंडातील सर्वात मोठी व्यापार पेठ समजली जाते. नागपूर वृत्तातील वनांत वाघ, बिबट, अस्वल, तडस, रानगवे, सांबर, चितळ, हरीन, नीलगाय, काळवीट, रानडुक्कर, रानकुत्रे, अजगर आणि इतर वन्यप्राणी आढळून येतात. तसेच अनेक प्रकारचे पक्षीही आढळतात त्यास स्थलांतरीत पक्षांचा देखील समावेश आहे.वन्य प्राण्याचे संवर्धन आणि संरक्षण चांगल्या प्रकारचे होण्याचे हेतुने या वृत्तात नवेगांव बांध - नागझीरा पेंच राष्टीय उद्यान तसेच उमरेड - बोर अभयारण्याची निर्मीती करण्यात आलेली आहे. त्यांचे व्यवस्थापन मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचेकडे आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नवेगांव बांध - नागझीरा येथे व्याघ्र प्रकल्प घोषित झाला