Field Offices

 
About

 

1983 पूर्वी मुळ चांदा जिल्हयांतील वनांचे कामकाज चंद्रपूर वनवृत्ताकडूनच केल्या जात होते.जिल्हयाचे पुनररचनेमुळे 26 ऑगस्ट, 1982 पासून चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर चंद्रपूर वनवृत्ताचे विभाजन होउन दि. 1 सप्टेंबर 1983 पासून दक्षिण चंद्रपूर व उत्तर चंद्रपूर वनवृत्त कार्यान्वीत होवून दक्षिण चंद्रपूर वनवृत्तात मध्य चांदा, आलापल्ली, सिरोंचा व भामरागड या वनविभागाचा व उत्तर चंद्रपूर वनवृत्तात चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वडसा व गडचिरोली या वनविभागांचा समावेश होता.महाराष्ट्र शासन अधिसुचना दि.5 मे, 2010 अन्वये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सभोवतील 1101.77 चौ.कि.मी.क्षेत्र बफर झोन म्हणून अधिसुचीत करण्यात आले आहे.बफर क्षेत्रात 401.49 चौ.कि.मी.वनेत्तर जागेचा समावेश आहे.सदर क्षेत्रापैकी या वनवृत्तातील चंद्रपूर वनविभागातील 541.088 चौ.कि.मी.व ब्रम्हपुरी वनविभागातील 33.685 चौ.कि.मी.क्षेत्र सदर अधिसुचनेच्या अनुषंगाने शासन निर्णय दि.15 नोव्हेंबर, 2011 मध्ये नमूद केल्यानुसार वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीने दि.21.11.2011 पासुन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पास हस्तांतरीत करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासन निर्णय, दि. 19 मे, 2012 अन्वये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्रातील व्यवस्थापनाबाबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत कोअर क्षेत्राबरोबरच संपूर्ण अधिसुचीत बफर क्षेत्र याचे एकात्मिक प्रशासकीय नियंत्रण क्षेत्र संचालक, व्याघ्र प्रकल्प, ताडोबा यांच्या नियंत्रणाखाली राहील तसेच अधिसुचीत बफर क्षेत्रातील चालू असलेली वानिकी कामे क्षेत्र संचालक यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालू राहतील व सदर आदेश तात्काळ अंमलात येतील असा निर्णय झाला आहे.चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा जागतिक स्तरावर वाघांसाठी प्रसिध्दी मिळालेला प्रकल्प आहे.चंद्रपूर पासून 20 कि.मी.अंतरावर ताडोबातील मोहर्ली गेट मधून ताडोबात प्रवेश करता येते. ताडोबा राष्ट्रीय उदयान हे 9 एप्रिल, 1955 ला घोषित झाले तर 1986 मध्ये ताडोबा राष्ट्रीय उदयान व अंधारी अभयारण्य या दोन्हीचे मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अंधारी नदी वाहते.तसेच तिथे ताडोबा देवाचे मंदिर आहे.यावरून या प्रकल्पास ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे नाव देण्यात आलेले आहे.ताडोबाचे प्रामुख्याने 2 विभाग आहे, कोर व बफर, कोरचे भौगोलिक क्षेत्र 621.81 चौ.कि.मी.मध्ये आहे.तर बफरचे भौगोलिक क्षेत्र 700.10 चौ.कि.मी.आहे. ताडोबामध्ये प्रवेश करण्यासाठी एकुण 16 प्रवेश दवारे आहेत. ताडोबामध्ये भ्रमंतीसाठी ऑनलाईन बुकींची व्यवस्था केली आहे.ताडोबामध्ये भ्रमंतीसाठी खुल्या जिप्सी व खुल्या बसेसची सोय वनविभागादवारे करण्यात येते.चंद्रपूर वनवृत्तामध्ये चंद्रपूर जिल्हयातील एकुण 15 तालुक्यांचा समावेश होत असून वनवृत्तातील एकुण गावांची संख्या 1792 आहे.वनक्षेत्रात गोंड व माडिया, परधान आदिवासी बांधव प्रामुख्याने आहेत. या वनवृत्ताचे बहुतांश क्षेत्र नक्षलप्रभावीत आहे.प्रशासकीय कामकाजाचे व वनांचे व्यवस्थापनेचे दृष्टीने या वनवृत्तात चंद्रपूर, ब्रम्हपुरी व मध्य चांदा असे तीन प्रादेशिक वनविभाग आहेत. वनवृत्ताचे एकुण भौगोलिक क्षेत्र 9870.68 चौ.कि.मी. असून वनक्षेत्र 2759.75 चौ.कि.मी आहे.भौगोलिक क्षेत्राचे तुलनेत वनक्षेत्राचे प्रमाण 27.96% आहे.

· विस्तार - उत्तर अक्षांश : 18.4 ते 20.5 पूर्व अक्षांश : 78.5 ते 80.6

· चतु:सिमा - पूर्वेस : गडचिरोली जिल्हा पश्चिमेस : यवतमाळ जिल्हा

उत्तरेस : नागपूर, भंडारा, वर्धा जिल्हा दक्षिणेस : तेलंगाना राज्य                           चंद्रपूर वनविभागाबददल माहिती