लोकसेवा अधिनियम/माहिती अधिकार

सेवा हक्‍क कायदा

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते.

# सेवेचे नाव लिंक
1 तेंदुपान कंत्राटदार/उत्पादक यांची नोंदणी करणे Apply
2 बांबू पुरविणेसाठी नवीन बुरड कामगाराची नोंदणी करणे Apply
3 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान भरपाई मंजुर करणे Apply
4 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजुर करणे Apply
5 वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुर करणे Apply
6 वन्यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामात फोटोग्राफीसाठी परवानगी (वृत्‍तस्‍तर) season(Circle Level) Apply
7 वन्‍यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामात फोटोग्राफीसाठी परवानगी (एकापेक्षा अधिक वृत्‍तांसाठी) Apply
8 आरागिरणी परवान्याचे नुतनीकरण Apply
9 बिगर नागरी क्षेत्रामध्ये * झाडे तोडण्याकरिता बिगर आदिवासी अर्जदारांना परवानगी Apply
10 बिगर नागरी क्षेत्रामध्ये * झाडे तोडण्याकरिता आदिवासी अर्जदारांकरिता परवानगी Apply
11 औद्योगिक वाहतुक पासकरीता नोंदणी करणे; Apply
12 वनेत्तर जमिनी बाबतचा दाखला मिळविण्याकरिता अर्ज Apply
13 वनहद्दीपासून अंतरचा दाखला मिळविण्याकरिता अर्जं Apply