महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५" (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१) |
|
महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम, २०१६ |
|
सदर अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू असेल. |
|
सदर अधिनियम कोणतेही कायदे, नियम, अधिसूचना, आदेश, शासन निर्णय किंवा इतर कोणत्याही संलेख यांच्या तरतुदीनुसार पात्र व्यक्ती, लोकसेवा देणारी सार्वजनिक प्राधिकरणे आणि स्थानिक संस्था यांना लागू होईल. तसेच लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांना लागू होईल. उदा.वनविभाग |
|
पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरीता आणि पात्र व्यक्तींना लोकसेवा देणा-या सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व |
|
लोकसेवा हक्क अधिनियमाच्या कलम -३ नुसार सार्वजनिक प्राधिकरणाद्वारे अधिसूचित केलेल्या लोकसेवांना सदर अधिनियम लागू आहे. सध्या या अधिनियमांतर्गत वनविभागामध्ये एकूण १३ सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. |
|
i) तेंदूपान कंत्राटदार / उत्पादक यांची नोंदणी करणे. ii) बांबू पुरविणेसाठी नवीन बुरड कामगारांची नोंदणी करणे. iii) वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान भरपाई मंजुर करणे. iv) वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजुर करणे. v) वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुर करणे. vi) वन्यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामात फोटोग्राफीसाठी परवानगी (वृत्तस्तर ) vii) वन्यजीव क्षेत्रात पर्यटन हंगामात फोटोग्राफीसाठी परवानगी (एकापेक्षा अधिकवृत्तांसाठी ) viii) आरागिरणी परवान्याचे नुतनीकरण ix) बिगर नागरी क्षेत्रामध्ये झाडे तोडण्याकरीता बिगर आदिवासी अर्जदारांना परवानगी x) बिगर नागरी क्षेत्रामध्ये झाडे तोडण्याकरीता आदिवासी अर्जदारांकरीता परवानगी xi) औद्योगिक वाहतुक पासकरीता नोंदणी करणे xii) वनेत्तर जमिनी बाबतचा दाखला मिळविण्याकरीता अर्ज xiii)वनहद्दीपासून अंतरचा दाखला मिळविण्याकरीता अर्ज |
|
सार्वजनिक प्राधिकरणाने लोकसेवा सेवा प्राप्त करण्यासाठी अर्जासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी, त्यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर किंवा विभागाच्या संकेतस्थळावर किंवा पोर्टलवर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. |
|
|
|
नाही. नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा पात्र व्यक्तीचा हक्क कायदेशिर,त्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन आहे. |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न